
हनुमान जयंतीच्या पर्वावर अमिर्झा येथे महर्षी वाल्मीकी़ ऋषीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना
गडचिरोली : महर्षी वाल्मिकी ऋषी रामायणाचे रचनाकार आहेत, महाकाव्य रामायण हे भगवान श्रीराम यांच्या जीवनातून आपणास जीवनातील सत्य कर्तव्य साहस आणि आदर्श यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते, अमिर्झा येथील ढिवर भोई समाजाच्या वतीने उभारण्यात आलेले महर्षी वाल्मिकी यांचे मंदिर केवळ श्रध्दास्थानच नव्हे तर समाज एकतेचे दर्शन घडावे, असे प्रतिपादन मौशिखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचे लोकनेते अरविंद कात्रटवार यांनी केले.
अमिर्झा येथे ढिवर भोई समाज बांधवांच्या वतीने महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिराचे बांधकाम करण्यात आले. गुरूवारी हनुमान जयंतीच्या पर्वावर भक्तीमय वातावरणात मंदिरात महर्शी वाल्मीकीच्या मुर्तीची अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळयानिमित्य सकाळपासून विविध कार्यक्रम पार पडले.
अरविंद कात्रटवार म्हणाले की, सेवाभाव जोपासून केलेल्या कार्यामुळे आत्मिक समाधान मिळते. भोई समाज बांधवांनी महर्षी वाल्मिकीच्या मंदिर उभारणीचा निर्णय घेतल्यानंतर मंदिर बांधकामासाठी सहकार्याची भावना जोपासली. हनुमान जयंतीच्या पर्वावर महर्षी वाल्मिकी ऋषींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याचे भाग्य लाभले. यावरून समाजबांधवांची आपल्यावर असलेले प्रेमभावना व्यक्त होते. ढिवर भोई समाज बांधवांच्या अनेक समस्या प्रलंबीत आहेत शासनाच्या योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहचलेला नाही, समाज शासनाच्या विविध योजना पासून वंचीत आहेत समाजातील प्रत्येक घटकांचा विकास झाला पाहिजे. ढिवर भोई समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे अरविंद कात्रटवार म्हणाले.
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, विनोद चापले, दिपक लाडे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी, प्रकाश भजबुजे, अमित हुलके, सुरेश वाघाडे, अमर सोरते, प्रशांत ठाकूर, देवेंद्र मुळे, गणेश ठाकरे, कैलास लाडे, दीपक राऊत, रोशन कोरते, विश्वनाथ भानारकर, जगदीश खेवले, कवडू खेडेकर, आशिष निकुरे, अमोल मेश्राम, मयुर मेश्राम, किशोर म्हशाखेत्री, मोहन ठाकरे, नवनीत मेश्राम, विलास नैताम, दीपक वलादे, जीवन कुरुडकर व गावकरी उपस्थित होते.



