गडचिरोलीविदर्भ

श्रीराम विद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

दोन विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

कोरची : येथील श्रीराम विद्यालयात अखिल भारतीय राष्ट्रीय विज्ञान मेळावा अंतर्गत एक दिवसीय तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोरची केंद्राचे केंद्रप्रमुख हिराजी रामटेके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून साधन व्यक्ती विनायक लिंगायत, प्रमोद वाढणकर, योगेश शुक्ला, प्रभाकर गेडाम, सुरज हेमके, मनोज बनसोड, किशोर ढवळे, शितल टेंभुर्कर, के.एम. लंजे आदी उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कोरचीचे अनिरुद्ध चांभारे होते.

‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा स्पर्धेचा मुख्य विषय होता. स्पर्धेत तालुक्यातील बऱ्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी भाषेचा वापर करून वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला. सर्वप्रथम स्पर्धा घेताना  लेखीपेपर घेण्यात आला. त्यानंतर सादरीकरण व वक्तृत्व घेण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आले.

कृत्रिम बुद्धीमता विषयी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे अनिरुद्ध चांभारे यांनी सकल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता फायदे व तोटे  सांगितले.

स्पर्धेनंतर लगेच निकाल घोषित करण्यात आला. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत धनंजय स्मृती विद्यालय बेतकाठीची विद्यार्थिनी अलिषा इरफान शेख वर्ग 8 वी हिने प्रथम क्रमांक तर जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री अंकालु बगवा वर्ग 9 वी हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. दोन्ही विद्यार्थिनींची निवड जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी झाली असून, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन त्यांचे केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन हेमंत भुसारी तर आभार सुरज हेमके यांनी  मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button