गडचिरोलीविदर्भ

भगवंतराव महाविद्यालयात युवा संघटना गठित

गडचिरोली : एटापल्ली येथील भगवंतराव महाविद्यालयात विद्यार्थ्यांतून युवा संघटना गठित करण्यात आली. यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक मलेवार यांनी संघटनेचे कार्य समजावून सांगत शहराला अवैध दारू व तंबाखू विक्रीमुक्त करण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले.

एटापल्ली येथील भगवंतराव महाविद्यालयात युवा संघटना कार्यक्रमात किशोर मलेवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. युवा देशाची ताकत आहे. सुदृढ युवा राष्ट्राची शक्ती व देशाची शान आहे. यासाठी मुला-मुलींनी तंबाखू, खर्रा या व्यसनापासून दूर राहून दारू तंबाखूमुक्तीच्या लढ्यात सहकार्य करावे, अशी व्यापक चर्चा केली. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची युवा संघटना गठित करण्यात आली. संघटनेने वॉर्डमध्ये अवैध दारूविक्री व तंबाखूविरोधी कृती कार्यक्रम करीत पोस्टर व सभेच्या माध्यमातून जागृती करण्याबाबत माहिती दिली.

यावेळी प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे, प्रा. निलेश दुर्गे, एनएसएस विभाग प्रमुख प्रा. संदीप मैंद, डॉ. सुधीर भगत यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button