गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

गळफास घेऊन पोलीस हवालदाराची आत्महत्या

गडचिरोली : प्राणहिता पोलीस उपमुख्यालय, अहेरी येथे कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. अविनाश सुंदरराव नाईकवाडे (वय ३८) असे मृत हवालदाराचे नाव आहे.

अविनाश नाईकवाडे हे पोलीस संकुलाच्या इमारतीत राहत होते. आज सकाळी पोलीस हवालदार अमीर शेट्टे हे त्यांच्या खोलीच्या गॅलरीत मोबाईलवर चित्रपट पाहत असताना त्यांना अविनाश नाईकवाडे हे हॉलमध्ये लटकलेले दिसले.  त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील इजपवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर माने तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button