भंडाराविदर्भ

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भंडारा : भंडाराकडे येत असलेल्या २१ वर्षीय युवकाच्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना भंडारा वैनगंगा नदीपुलाकडे जाणाऱ्या महामार्गावर (दि.११) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. सौरभ सेवक आकरे (२१, आंबाडी, ता. भंडारा), असे मृत युवकाचे नाव आहे.

सौरभ आकरे हा दुचाकी क्रमांक एमएच ३६ एएच २०२७ ने भंडाराकडे येत होता. दरम्यान, भंडाराहून रायपूरकडे जाणाऱ्या ट्रक (सीजी ०८ एटी ८१९९) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात सौरभ ठाकरे गंभीररीत्या जखमी झाला. अपघातानंतर काही वेळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button