गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

१५ लाखापर्यंतची कामे करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना द्या – सरपंच संघटनेची मागणी

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवेदन

गडचिरोली : १५ लाखापर्यंतची कामे करण्याचे अधिकार पूर्वरत ग्रामपंचायतींना देण्यात यावे. तसेच जिल्हा परिषद मार्फत ९ सप्टेंबर पासून होणारी ओपन टेंडर कामे थांबविण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील सरपंचांनी केली आहे.

याबाबत गडचिरोली जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतींना १५ लाखाचे काम करण्याचे अधिकार न्यायालयाच्या निर्णयाअगोदर होते. परंतु, ते अधिकार ग्रा.पं. कडून काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे सरपंचपद नाममात्र होते की काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. १५ लाखांपर्यंतची कामे करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला प्रदान करावेत. तसेच जिल्हा परिषद, गडचिरोलीतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून ९ सप्टेंबर २०२४ पासून ३ लाखावरील सर्व कामे ओपन टेंडर करणार आहेत. त्या कामाचे ओपन टेंडर थांबविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना सरपंच संघटनेच्या जिल्हाध्यक्ष अपर्णा राऊत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप वरखडे, जिल्हा सचिव पुरुषोत्तम बावणे, सदस्य संजय गावडे, चेतन सूरपाम व सरपंच उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button