गडचिरोलीविदर्भ

मूतनूर येथील पाहांदी पारी कुपार लिंगो देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा – डॉ. प्रणय खुणे यांची मागणी

गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या मूतनूर येथील पाहांदी पारी कुपार लिंगो देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, राज्य सरकारने जिल्ह्यातील या दुर्लक्षित पर्यटन स्थळाचा विकास करावा, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केली आहे.

जिल्हा मुख्यालय पासून 40 किलोमीटर अंतरावर व चामोर्शी पासून 25 किलोमीटर अंतरावरील मुतनूर या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य (क) वर्ग दर्जा पर्यटन स्थळ आहे, येथे चार पहाडीच्या पायथ्याशी पाहांदी पारी कुपार लिंगो देवस्थान आहे, या पहाडीवर आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत व राजाराणी, शंकर-पार्वती, हनुमान मंदिर, दुर्गा मंदिर व इतर पौराणिक देवस्थान आहे. प्राचीन काळापासून मुतनूरच्या या निसर्गरम्य पहाडीवर दरवर्षी मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य यात्रा भरत असते.

या यात्रेनिमित्ताने विदर्भातील भाविक भक्त या ठिकाणी येत असतात व दर्शन घेऊन हजारोंच्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतात. यावर्षी सुद्धा सदर यात्रा निमित्याने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी सदिच्छा भेट दिली व आदिशक्ती दुर्गा माता मंदिरात पूजन केले. येथील जयपूर व राजस्थान येथील कलाकारद्वारा पन्नास लक्ष रुपये स्वखर्चाने तयार करीत असलेल्या नवनिर्मित आदिशक्ती दुर्गा माता मंदिराची पाहणी केली. यावेळी समस्त जिल्ह्यातील तसेच विदर्भातील भाविक भक्त बांधव या यात्रेनिमित्त या ठिकाणी मोठया संख्येने आले होते.

जिल्ह्यातील भाविक भक्तांनी गुढीपाडव्याच्या दिवशी या यात्रेला भेट देऊन  महाप्रसादाचा लाभ घेतला. मुतनूर येथील देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे डॉ. प्रणय खुणे यांनी सांगितले. यावेळी पहाडीच्या पायथ्याशी गावाच्या मध्यंतरी असलेल्या तलावाची खोलीकरण करून त्या ठिकाणी बोटिंग व्यवस्था तसेच रेन डान्स, बगीचा, विश्रामगृह, साकारणार असे सांगितले व राज्य शासनाने पर्यटन विकास निधीतून निसर्गरम्य मुतनूर येथील पर्यटनस्थळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.

यावेळी मुंबई येथील एक्स सेवन न्यूज टीव्ही चॅनलचे व्यवस्थापकीय संचालक ब्रह्मानंद तिवारी, मानवाधिकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल झोडे, खुणे कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश डोंगरवार, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button