नागपूरविदर्भ

भाजपची विदर्भ विभागाची बैठक : स्थानिक स्वराज्य व पदवीधर निवडणुकीसाठी तयारी​

संघटनात्मक तयारीचा आढावा ; कार्यकर्त्यांना निवडणुकीत विजयाचे मंत्र

नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, विदर्भ विभागाच्या वतीने २५ सप्टेंबर रोजी नागपूर येथे अत्यंत महत्त्वपूर्ण व उत्साही बैठक पार पडली. या बैठकीत संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आणि निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या महत्त्वाच्या बैठकीस राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह विदर्भ संघटन मंत्री कोठेकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी, राज्यमंत्री पंकजजी भोयर, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार सुनील मेंढे व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.​\

यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची खास भेट घेतली व आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत आणि स्थानिक प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. बैठकीदरम्यान ही महत्त्वपूर्ण भेट घडल्यानं, आरमोरी क्षेत्रातील विकासास चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.​ यावेळी विदर्भ विभागातील अनेक प्रमुख मान्यवर व पक्षाचे नेतेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.​

बैठकीत आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने संघटन बांधणी, कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आणि प्रभावी निवडणूक धोरण यावर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कार्यपद्धती, जनसंपर्क मोहिमा अधिक व्यापक करणे, तसेच प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी निश्चित करण्याबाबत मौलिक सूचना दिल्या. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विकास योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे आणि मतदारांशी सक्रिय संवाद साधून शासनाचे कार्य प्रभावीपणे लोकांसमोर मांडण्याचे आवाहन केले. ​तर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षाची विचारसरणी आणि ध्येयवाद घरोघरी पोहोचवत, बूथ स्तरावर संघटना अधिक मजबूत करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवण्याचा संकल्प करण्याची प्रेरणा दिली.​

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button