गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लवकरच होणार वसाहत

आ. डॉ. देवराव होळी यांनी केली पाहणी ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार

गडचिरोली : आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रयत्नातून गडचिरोली येथे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी १९० कोटी रुपयांच्या निधीतून, पोलीस अधिकारी व कर्मचारी निवास इमारत बांधण्यात येत आहे. या पोलीस वसाहत बांधकामाची आमदार डॉ. देवराव होळी यांनी पाहणी केली व निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुधिर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

१९० कोटी रुपयांच्या या बांधकामात १३ बिल्डिंग व ३६४ फ्लॅट असून यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान आहेत. या बांधकामाची पाहणी करताना नियोजित कालावधीत व दर्जेदार काम करावे अशा सूचना आ. डॉ. होळी यांनी उपस्थित अभियंत्यांना दिल्या. यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर विजय शहा, सिव्हील इंजि. राहुल भोयर, सिव्हील इंजि. राहुल कुमरे, सिव्हील इंजि. राजू जाधव, सिव्हील इंजि. संदेश राऊत, सिव्हील इंजि. ऐसाज पठाण यांचेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button