
पक्ष संघटन, सदस्य नोंदणी अभियान या विषयावर सविस्तर चर्चा
कुरखेडा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वात कुरखेडा तालुक्यात दौरा करण्यात आला. या दौऱ्यादरम्यान कुरखेडा तालुक्यातील रामगड येथे माजी उपसभापती बौद्धकुमार लोणारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन तालुक्यातील पक्ष संघटन, सदस्य नोंदणी अभियान या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी कृषी सभापती नाना नाकाडे, माजी जिप अध्यक्ष समय्या पसूला, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सोनल कोवे, जिल्हा कार्याध्यक्षा रुषाली भोयर, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्या कल्पना तिजारे, जिल्हा सचिव कपिल बागडे, विधानसभा अध्यक्ष किशोर तलमले, अयुब शेख, आरमोरी तालुका अध्यक्ष अमीन लालानी, कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, प्रल्हाद वाघारे, भूमिका बागडे उपस्थित होते.



