
भंडारा : राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार आणि खनिकर्म राज्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे मंगळवार, २ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध प्रशासकीय आणि राजकीय बैठका घेणार आहेत.
सकाळी १०:३० वाजता: मंत्री भोयर यांचे शासकीय विश्रामगृह, भंडारा येथे आगमन होईल. यावेळी ते स्थानिक मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतील. सकाळी ११:३० ते दुपारी १:००: विश्रामगृह येथे जिल्हा भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. दुपारी १:०० ते २:३०: जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभाग प्रमुखांसोबत ते आढावा बैठक घेतील. दुपारी २:३० ते ३:००: जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाच्या स्थितीबाबत बँकर्ससोबत चर्चा करण्यासाठी बैठक होईल. दुपारी ३:०० ते ३:३०: पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस प्रशासनासोबत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३:३० वाजता: सर्व बैठकांनंतर पालकमंत्री भोयर हे नागपूरकडे प्रयाण करतील.



