
माजी आ. कृष्णा गजबे यांची सपत्नीक उपस्थिती
देसाईगंज : तालुक्यातील आमगाव येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत महापुराण कथा सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी (दि. १७) आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. कृष्णा गजबे आणि त्यांच्या पत्नी विद्या गजबे यांनी उपस्थिती लावली. त्यांनी या सोहळ्याचा लाभ घेतला आणि संतांचे आशीर्वाद घेतले.
१४ ऑगस्ट पासून सुरू झालेली ही भागवत कथा २० ऑगस्ट २०२५ पर्यंत दररोज दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या दिव्य कथामालेचे प्रवचन श्री. हित वनमाली दास जी महाराज (वृंदावन) आणि परमपूज्य गुरुदेव डॉ. श्री. रामनारायण त्रिपाठी जी महाराज (चित्रकूट) देत आहेत, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमादरम्यान, गजबे दांपत्याने आमगाव येथील प्राचीन श्रीराम मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले आणि जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. या सोहळ्याला स्थानिक भागातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेत आहेत.



