अमरावतीक्राईमविदर्भ

दारू अड्ड्यांवर धाड ; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

वडाळी परिसरात दोन ठिकाणी धाडसत्र

अमरावती : गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ व २ च्या पथकाने शनिवारी फ्रेजरपुरा हद्दीतील वडाळी परिसरात दोन ठिकाणी धाडसत्र राबवून लाखो रुपयांची गावठी दारू नष्ट केली. या कारवाईत १ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा १ व २ च्या पथकाने एकत्रीतरित्या पारधी बेडा, भारतनगर, वडाळी तसेच परिहारपुरा येथे कारवाई केली. पोलिसांनी तेथील २६ ड्रम मोहा सडवा तसेच २७७ लिटर गावठी हातभट्टीची दारु व इतर साहित्य असा माल जप्त केले. तसेच गावठी दारू व मोहाडा सडवा रस्त्यावर ओतून नष्ट करण्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला वडाळी परिसरातील बादशहासिंग अजाबसिंग टांक याच्या घरातून गावठी दारु गाळण्याकरिता उपयोगी येणारा मोहाचा सडवा, हातभट्टीची दारु असा १ लाख ७० हजार २५० रुपयांचा माल जप्त केला. त्यानंतर परिहारपुरा येथील एका महिलेच्या राहत्या घरी धाड टाकून तेथूनही गावठी हातभट्टी दारु व इतर साहित्य असा २७ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव व बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वात एपीआय मनीष वाकोडे, सत्यवान भुयारकर, पोलीस हवालदार राजूआप्पा, फिरोज, अजय मिश्रा, मंगेश शिंदे, दिनेश नांदे, चेतन कराळे, सुरज चव्हाण, निखील गेडाम, राजीक रायलीवाले, अमर कराळे, ज्योती झाडे, दर्शना वानखडे, वैशाली बनारसे तसेच गुन्हे शाखा, आर.सी.पी. व मुख्यालय येथील पोलिसांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button