गोंदियामहाराष्ट्रविदर्भ

अंमली पदार्थाचा दुरूपयोग आणि अवैध तस्करी विरूध्द आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

गोंदिया : जिल्हा विधी सेवा सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा वकिल संघ गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थाचा दुरूपयोग आणि अवैध तस्करी विरूध्द आंतरराष्ट्रीय दिवस व CPR उपचाराबददल प्रात्यक्षिकरण दिनानिमीत्त जनजागृती कार्यक्रम 26 जुन रोजी आयोजित करण्यात आला होता.

यावेळी डी.व्ही. हरणे (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर), ए.ही. कुलकर्णी (मुख्य न्यायदंडाधिकारी), एन.के. वाळके (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधीकरण), वाय.के. राऊत (२ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर), एम.बी. कुडते (३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर), वाय.जे. तांबोळी (४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर), टी.व्ही. गवई (५ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर), एस.व्ही. आव्हाड (६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर), ॲड. टी.बी. कटरे (अध्यक्ष जिल्हा वकील संघ), ॲड. मेघा रहांगडाले (उपाध्यक्ष, जिल्हा वकील संघ), ॲड. शबाना अन्सारी प्रमुख लोक अभिरक्षक कार्यालय गोंदिया, डॉ. जितेंद्र गुप्ता व डॉ. अपूर्व गुप्ता, आयुष्य क्रिटीकल केयर एंड मल्टीस्पेसिलीटी हॉस्पीटल, गोंदिया तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी ॲड. शबाना अंसारी यांनी ‘अंमली पदार्थाचा दुरूपयोग आणि अवैध तस्करी’ या विषयावर आपले मत मांडले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतीथी डॉ. जीतेंद्र गुप्ता व डॉ. अपूर्व गुप्ता, आयुष्य क्रीटीकल केयर एंड मल्टीस्पेसिलीटी हॉस्पीटल, गोंदिया यांनी CPR Cardio Pulmonary Resuscitation उपचाराबद्दल प्रात्यक्षिकरण करून दाखविले व कोणत्याही व्यक्तीला हार्ट-अटैक किंवा कार्डिएक अरेस्टच्या स्थीतीत प्राथमिक उपचार कसे करायचे याचे प्रात्यक्षिकरण करून दाखविले. डी.व्ही. हरणे यांनी अंमली पदार्थाचा उपयोग औषधी बनविण्याकरीता झाला पाहिजे, परंतु युवा पीढीमध्ये अंमली पदार्थाचा उपयोग वाढलेला आहे. ज्यामुळे त्यांचेच नाहीतर संपूर्ण कुंटुंबाचे भविष्य अंधकारात जात आहे, हे थांबविण्याकरीता जनजागृती करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचारी, अधिक्षक पी.बी. अनकर, कनिष्ठ लिपीक ए.एम. गजापुरे, एस.एम. कठाणे, पी.एन. गजभिये, एस.डी. गेडाम, पी.डी. जेंगठे, के.एस. चौरे, एल.ए. दर्वे, लेखापाल आलेशान मेश्राम, शिपाई बी.डब्लू. पारधी, आर.ए. मेढे, सरतिमा भगत तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे लिगल ऐड डिफेन्स कॉन्सेल, जिल्हा वकील संघ यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button