गडचिरोलीविदर्भ

अपघातग्रस्त डोंगरे कुटुंबाला अम्ब्रीशराव आत्राम यांचा आधार; टेकडा येथे भेट देऊन केली आर्थिक मदत

दुचाकी अपघातात कर्त्या व्यक्तीचे निधन; आत्राम यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन

सिरोंचा : अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या सिरोंचा तालुका दौऱ्यादरम्यान संकटात सापडलेल्या एका सामान्य कुटुंबाला मदतीचा हात देऊन आपला लोकसंग्रह पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. टेकडा येथील रहिवासी व्यंकटी लचय्या डोंगरे यांच्या दुर्दैवी निधनानंतर उघड्यावर पडलेल्या त्यांच्या कुटुंबाची महाराजांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले.

टेकडा येथील व्यंकटी लचय्या डोंगरे यांचा काही दिवसांपूर्वी दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांवर मोठा आर्थिक आणि मानसिक आघात झाला. या घटनेची माहिती राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना कार्यकर्त्यांमार्फत मिळताच, त्यांनी आपल्या दौऱ्याचा मार्ग बदलून तातडीने डोंगरे कुटुंबाचे घर गाठले.

राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी डोंगरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. “या कठीण प्रसंगात तुम्ही एकटे नाही, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” अशा शब्दांत त्यांनी कुटुंबाला धीर दिला. केवळ सांत्वन न थांबता, महाराजांनी या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत सुपूर्द केली, ज्यामुळे डोंगरे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.

याप्रसंगी मल्लना संगर्ती, संतोष पडाला, शंकर नरहरी, मधुकर नीलम, तिरुपती जंगा, राजेशम काशेट्टी, राजबापू पोलमपल्ली, श्रीनिवास ओल्लाला, शंकर कवरे, स्वप्नील पेद्दी यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. एका सामान्य कुटुंबावर ओढवलेल्या संकटाची दखल घेऊन स्वतः राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी टेकडा गाठल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराजांच्या या संवेदनशिलतेमुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button