गोंदियाविदर्भ

२-डी ईको शिबिरात ८८ बालकांची तपासणी

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात शिबिराचे आयोजन

गोंदिया : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत १६ व १७ जुलै रोजी राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण महिन्याच्या अनुषंगाने तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात २-डी ईको शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती जायस्वाल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय भगत यांच्यासह राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम व डीईआयसीचे सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

शिबिरात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकाद्वारे तपासणीदरम्यान निघालेल्या संशयित हृदय रुग्ण मुलांची २-डी ईको तपासणी वर्धा येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील डॉ. शंतनू गोमासे व समन्वयक प्रतीक गडकरी यांच्या पथकाद्वारे करण्यात आली. शिबिरात एकूण ८८ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३५ लाभार्थी शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. तर १७ लाभार्थी फॉलोअपमध्ये असून सहा लाभार्थ्यांना औषधोपचार देऊन समुपदेशन करण्यात आले. तसेच त्यातील ३० लाभार्थी नॉर्मल निघाल्याने त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे संजय बिसेन व डॉ. पाटील यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button