क्रीडागडचिरोलीविदर्भ

गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या प्रिन्स पोटावीची महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघात निवड

गडचिरोली : येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयातील वर्ग ८ वीचा विद्यार्थी प्रिन्स पोटावी याची महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. ही निवड त्याच्या कठोर परिश्रम, चिकाटी आणि खेळाविषयी असलेल्या समर्पणाचे फलित असून, ही बाब संपूर्ण वि‌द्यालयासाठी अभिमानास्पद आहे.

प्रिन्स पोटावी हा लहान वयापासूनच क्रीडाक्षेत्रात विशेष रस घेत असून, शाळेतील क्रीडा स्पर्धांमध्ये त्याने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यालयातील अनुभवी क्रीडा शिक्षक भूपेंद्र चौधरी व मार्गदर्शक शंकर दासरवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने नियमित सराव करत आपली कौशल्ये अधिक विकसित केली. शिस्त, वेळेचे नियोजन व संघभावना या गुणांच्या बळावर त्याने अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणीत यश संपादन केले.

महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघात निवड झाल्यामुळे प्रिन्सला राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असून, तो आगामी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राकडून खेळणार आहे. त्याच्या या यशामुळे गोंडवाना सैनिकी वि‌द्यालयाची क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल परंपरा अधिक बळकट झाली आहे.

या उल्लेखनीय यशाब‌द्दल विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे क्रीडा शिक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रिन्स पोटावी याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच पालकांनीही त्याच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. प्रिन्सच्या या निवडीमुळे विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात उच्च ध्येय ठेवून मेहनत करण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे. त्याची ही कामगिरी आगामी पिढीसाठी आदर्श ठरणारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button