गडचिरोलीविदर्भ

200 विद्यार्थ्यांनी गिरविले तंबाखुमुक्तीचे धडे

व्यसनमुक्त जीवन जगण्याचा केला संकल्प

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मोहली येथील जिप हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात तंबाखुमुक्त शाळा कृती कार्यक्रम घेण्यात आला. यामाध्यमातून 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी तंबाखुमुक्तीचे धडे गिरवित व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला.

यावेळी मुक्तिपथ टीमने शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी शाळेतील सर्व मुख्यध्यापक, शिक्षक, विद्यार्थी खर्रा तंबाखूमुक्त असणे आवश्यक आहे. तंबाखूमुक्त शाळेकरीता निकष व कोटपा कायदया अंतर्गत असलेल्या तरतुदी समजावुन सांगण्यात आले. शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी नियंत्रण समिती स्थापन करणे व कृती कार्यक्रम घेणे. शालेय परिसरात खर्रा तंबाखूमुक्तजण्य पदार्थ सेवन करणे गुन्हा आहे अशी सूचना नोटीस बोर्डवर लावुन ठेवने. शाळा प्रवेशद्वारा वर तंबाखूमुक्त संकल्प शाळा असा बोर्ड लावणे. शाळेच्या कंपाऊंड पासून १०० यार्ड परिसरात खर्रा किंवा तंबाखूजण्य पदार्थ आणू किंवा कोणीही दुकान किंवा पानटपरी लावुन विक्री करू नये. कोटपा कायदा २००३ ची पावती कार्यालयात ठेवणे. तंबाखूमुक्त शाळा परिसर रहावे याकरिता बोलके चित्र लावणे, परिपाठात विषय घेणे, निबंध स्पर्धा आयोजित करणे, व्यसनमुक्तीवर रैली काढणे, कर्तृत्व स्पर्धा आयोजित इत्यादी उपक्रम घेणे. तंबाखूमुक्त शाळा संकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करिता प्रत्येक वर्गातील व्यसनमुक्त सैनिक नेमून नियमित खिसे तपासणी करणे, दप्तर तपासणी करणे, तंबाखूमुक्तीचा संकल्प घेणे. मुलांची दंत चिकित्सक कडून तपासणी करणे, इत्यादी निकष सांगण्यात आहे. विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवून तंबाखुमुक्त शाळा करण्याचा संकल्प केला.

यावेळी मुख्याध्यापक गेडाम तसेच शिक्षक, मुक्तिपथ तालुका संघटक राहुल महाकुलकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button