गडचिरोलीविदर्भ

धावत्या चारचाकी वाहनाने घेतला पेट ; तिघेजण थोडक्यात बचावले

वाहनाचा झाला कोळसा ; धानोरा-मुरुमगाव मार्गावरील घटना 

धानोरा : मुरुमगाव मार्गावर सालेभट्टी गावाजवळ मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास धावत्या चारचाकी प्रवाशी वाहनाने पेट घेतला. वाहनात बसलेले तिघेही वाहनातून उतरल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहन जळून खाक झाले.

जळालेले वाहन धानोरा येथील राजकुमार वाघमारे यांच्या मालकीचे आहे. ते स्वतःच वाहन चालवत होते. ते धानोरावरून मुरुमगावकडे जाण्यासाठी निघाले होते. वाहनात इतर दोन सोबती बसले होते. वाहन सालेभट्टी गावाजवळ पोहोचताच वाहनाने पेट घेण्यास सुरुवात केली. ही बाब वाघमारे व इतर तिघांच्या लक्षात येताच, तिघेही वाहनातून खाली उतरले. अग्निशमन वाहन तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत वाहन जळून खाक झाले होते. राजकुमार वाघमारे यांचे वाहन जुने आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाहनाला आग लागल्याचे २ लक्षात येताच, वाहनात बसलेले सर्वच जण उतरल्याने जीवितहानी टळली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button