
हत्या की आत्महत्या ; चर्चेला उधाण
देवरी : तालुक्यातील गट ग्रामपंचायत भरेंगाव अंतर्गत येणाऱ्या नवाटोला शेतशिवारात एका २६ वर्षीय युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना शुक्रवारी (दि. १३) उघडकीस आली. प्राप्त आढळलेल्या तरुणाचे नाव शैलेश माहितीनुसार मृतदेह जयराम आचले (वय २६) असून तो मौजा पदमपूर, ता. देवरी येथील रहिवासी होता. शैलेश गेल्या दीड महिन्यांपासून नवाटोला येथील रमेश्वर कुमोटे यांच्या शेतात कामाला होता. शुक्रवारी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास घरी काही
कार्यक्रम असल्याचे सांगून तो कुमोटे यांच्याकडून सुटी घेऊन निघाला होता. मात्र सकाळी ११ वाजेच्या सुमारास नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ लगत असलेल्या रमेश्वर कुमोटे यांच्या शेताजवळील जंगल परिसरात ग्रामस्थांना एका छोट्याशा झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत शैलेशचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने देवरी पोलिस स्टेशनला या घटनेची सूचना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी ताफा घेऊन घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
ज्या झाडाला शैलेशने गळफास घेतला ते झाड अत्यंत छोटे असल्याने आणि मृतदेहाच्या स्थितीवरून ही आत्महत्या असावी की त्याची हत्या करून मृतदेह लटकविण्यात आला, याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे सांगितले आहे.



