गडचिरोलीविदर्भ

सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादन वाढवा – आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे शेतकऱ्यांना आवाहन

आलापल्लीत खरीप हंगामपूर्व आढावा बैठक व कार्यशाळा

अहेरी : रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांचा अधिक वापर करून शेतात उत्पादन वाढवावे, असे आवाहन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. आलापल्ली येथील वनविभागाच्या वनसंपदा सभागृहात आयोजित तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक व कार्यशाळेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजीवार, जिल्हा कृषी समन्वयक डॉ. किशोर झाडे, ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, सुरेंद्र अलोणे आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांवर भर देऊन धान, कापूस, मका, मिरची या पिकांसोबतच काजू, स्ट्रॉबेरी, नारळ यांसारखी पिके घ्यावीत. तसेच आर्थिक स्तर उंचावण्यासाठी जोडधंदा म्हणून शेततळे तयार करून मत्स्यव्यवसाय आणि बांबू लागवडही करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तत्पूर्वी, अहेरी उपविभागातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मूलचेरा या पाचही तालुक्यातील कृषीसंबंधी माहितीचा आढावा घेऊन, कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य व मदत करून शेतातील उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी जनजागृती करण्याचे निर्देश दिले.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक आनंद गंजीवार यांनी केले, तर संचालन भूषण गोव्हाळे यांनी केले. आभार चेतन पानबुडे यांनी मानले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी सेवक आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button