
भंडारा : अमृतवृक्ष संकल्पनेअंतर्गत जिल्हयात 15 सप्टेंबरपर्यत विविध वृक्ष लागवड सुरू आहे. पवनी तालुक्यातील चकारा येथील प्राचीन हनुमान मंदिर परिसरात नुकताच जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत 50 वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच पवनी तालुक्यातील अड्याळ येथील स्मशानभूमीवर “एक पेड माँ के नाम” या योजनेअंतर्गत 50 वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे, धान्य खरेदी अधिकारी सुहास टोंग, सरपंच शिवशंकर मुंगाटे व अड्याळ येथील ग्रामवासी राजेश वंजारी, कुलदीप उराडे, अतुल वानखेडे, अमोल उराडे, मयूर देशमुख, विशाल रणदिवे, हरीश लांजेवार उपस्थित होते.



