गडचिरोलीचंद्रपूरनागपूरविदर्भ

महावितरणचा वेगवान ‘इज ऑफ लिव्हिंग’ पॅटर्न! ; नागपूर परिमंडलात वर्षभरात ६६ हजार नवीन वीज जोडण्या

घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात ग्राहकांना तत्काळ सेवा

नागपूर : केंद्राच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ (Ease of Living) निर्देशांकाची प्रभावी अंमलबजावणी करत महावितरणच्या नागपूर परिमंडलाने ग्राहकांना तत्काळ सेवा देण्यावर भर दिला आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षात परिमंडलाने तब्बल ६६ हजार ४२२ लघुदाब (LT) ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देऊन एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात ही कामगिरी करण्यात आली आहे. नागपूर शहर मंडल: सर्वाधिक ३८ हजार ७६६ नवीन वीज जोडण्या. नागपूर ग्रामीण मंडल: १८ हजार १२६ नवीन वीज जोडण्या. वर्धा मंडल: ९ हजार ५३० नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

नागपूर जिल्ह्यात एकूण ५६ हजार ८९२ नवीन जोडण्या देण्यात आल्या. यामध्ये काँग्रेस नगर विभाग ११ हजार ८०१ जोडण्यांसह आघाडीवर आहे. त्याखालोखाल मौदा (८,५९७), बुटीबोरी (७,४८२) आणि महाल (७,२६२) विभागांचा क्रमांक लागतो. वर्धा जिल्ह्यात एकूण ९ हजार ५३० जोडण्यांपैकी सर्वाधिक ४ हजार ६०५ जोडण्या एकट्या वर्धा विभागात देण्यात आल्या आहेत.

वर्षभरात देण्यात आलेल्या ६६,४२२ जोडण्यांमध्ये घरगुती ग्राहकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. घरगुती: ५३,१३७ जोडण्या, वाणिज्यिक (Commercial): ९,६३५ जोडण्या, औद्योगिक (Industrial): १,२०३ जोडण्या, इतर: २,४४७ जोडण्या.

ज्या भागात पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, तिथे ‘मागेल त्याला ताबडतोब वीज जोडणी’ देण्याचे धोरण महावितरणने स्वीकारले आहे. यामुळे ग्राहकांना वीज जोडणीसाठी करावी लागणारी प्रतीक्षा आता संपली आहे. महावितरणने ग्राहकांना आवाहन केले आहे की, नवीन वीज जोडणीचा लाभ घेतल्यानंतर वीज बिलांचा भरणा ऑनलाईन पद्धतीने नियमित करून सहकार्य करावे.

डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तत्पर सेवेमुळे नागपूर परिमंडलातील ग्राहकांचा महावितरणवरील विश्वास वृद्धिंगत होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button