गडचिरोलीविदर्भ

युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

मुरुमगाव येथील घटना ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

धानोरा : तालुक्यातील मुरुमगाव येथे एका युवतीने घराशेजारील कुटुंबाच्या स्नानगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ११ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे. सीमा रमाधर मडकाम (२१) असे मयत युवतीचे नाव आहे. घराजवळ असलेल्या एका कुटुंबाच्या स्नानगृहात तिने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबाने ही माहिती मुलीच्या घरी कळवली. त्यानंतर मुरुमगाव पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह धानोरा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

आत्महत्येने मुलीच्या कुटुंबास मोठा धक्का बसला असून अधिक तपास सुरु असल्याचे प्रभारी अधिकारी मिथुन शिरसाट यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button