
स्वागत व सन्मानामुळे पठाण दाम्पत्य भारावले ; अरविंद कात्रटवार व मित्र परिवारांच्या वतीने ‘शिक्षणरत्न’ पुरस्कार देऊन गौरव
गडचिरोली : शिक्षण हे सामाजिक समता आणि सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे. तळागातील गोरगरीब मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा शैक्षणिक विकास घडवून आणणे ही शासन, शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी निगडीत सर्वांची जबाबदारी आहे. गडचिरोली सारख्या शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या जिल्हयात शिक्षण क्षेत्रात काम करण्याची मिळालेली ही गर्वाची बाब आहे. अरविंद कात्रटवार मित्रपरिवारांनी ‘क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणरत्न पुरस्कार’ देऊन केलेल्या सन्मानाचा आनंद ‘अलौकिक’ आणि आमच्या सेवा कार्याला उर्जा देणारा असल्याचे भावोद्गार प्राचार्य शमशेर खान पठाण आणि प्राचार्य लिना पठाण (हकीम) दाम्पत्याने पुरस्कार सोहळयाप्रसंगी काढले.
मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील लोकनेते अरविंद कात्रटवार व मित्र परिवाराच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आदिवासी अतिदुर्गग नक्षलग्रस्त आणि शैक्षणिकदृश्टया मागासलेल्या गडचिरोली जिल्हयात शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनिय योगदानाबद्दल प्राचार्य शमशेर पठाण व प्राचार्य लिना पठाण (हकीम ) दाम्पत्याचा ‘शिक्षणरत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळयाप्रसंगी प्राचार्य पठाण दाम्पत्याने भावना व्यक्त केली.
आदिवासी ढोल नृत्याच्या गजरात प्राचार्य पठाण दांम्पत्यांचे स्वागत करण्यात आले. अरविंद कात्रटवार व मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागत व सन्मानामुळे प्राचार्य शमशेर पठाण व प्राचार्य लिना पठाण हकीम भारावून गेले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ समाजसेवक प्रकाश ताकसांडे, मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील लोकनेते अरविंद कात्रटवार, सत्कारमुर्ती प्राचार्य शमशेर पठाण, प्राचार्य लिना पठाण हकीम, सामाजिक कार्यकर्ते यादव लोहंबरे, गोपाल मोंगकर उपस्थित होते.
शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रेरणा देतात आणि त्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतात. शिक्षकांनी केलेल्या त्यागामुळे आणि समर्पणामुळेच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. शिक्षणापासून वंचीत असलेल्या तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे सामाजिक समता आणि प्रबोधनपर शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा शिक्षणरत्न पुरस्काराचा हेतू आहे. प्राचार्य शमशेर पठाण आणि प्राचार्य लिना पठाण (हकीम) यांनी गडचिरोली सारख्या शैक्षणिकदृटया जिल्ह्यात केलेले शैक्षणिक व सामाजिक कार्य प्रशंसनीय आहे, असे गौरोद्गार प्रकाश ताकसांडे यांनी काढले.
याप्रसंगी प्रशांत ठाकूर, यादव चौधरी, जीवन कुरुडकर, विनोद चापळे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी, सुरेश कोलते, दिलीप वलादे, देवेंद्र मुळे, दीपक लाडे, विकास उंदीरवाडे, पुरुषोत्तम सुर्यवंशी, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुनघाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुनघाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज ठेंगे, स्वप्नील जुमनाके, पुरंदर उंदीरवाडे, मोतीराम चंद्रगिरे, अशोक धानफोले, भूषण सहारे, जयदेव मेश्राम, माणिक कारेते व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.



