गडचिरोलीविदर्भ

पोलीस वाहनाच्या धडकेत तीन जनावरे ठार 

चुरमुरा गावाजवळील घटना

आरमोरी : पोलिसांच्या विशेष अभियान पथकाच्या वाहनाची धडक बसून तीन जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना गडचिरोली-आरमोरी मार्गावरील चुरमुरा गावाजवळ शनिवारी (दि. 19) सकाळी 6.30 वाजता घडली. यामध्ये संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सकाळी एमएच-33/टी-1955 एमपीव्ही पोलिस पथकातील चालक देवाजी चमरू आहा हे 306 क्रमांकाच्या वाहनाने गडचिरोलीवरून आरमोरीकडे जात होते. दरम्यान, चुरमुरा गावाजवळ शेतकरी भास्कर आबाजी बोकडे यांच्या मालकीच्या दोन बैल व एक गोरा अशा तीन गुरांना पोलिस वाहनाने धडक दिली. ज्यामध्ये दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. या अपघातात शेतकऱ्याचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघातात काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेबाबत आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आरमोरी पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button