
कुरखेडा : कुरखेडा-कढोली मार्गावर गोठणगाव नाका ते मालदुगीदरम्यान अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी (दि.१७) सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडला. रघुनाथ तुलावी (५५, रा. मालदुगी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
रघुनाथ तुलावी हे कामानिमित्त गोठणगाव नाक्यावर आले होते. परत मालदुगीकडे जात असताना त्यांचा दुचाकीला एका ढाब्याजवळ चारचाकी वाहनाने धडक दिली. अपघातानंतर चालक वाहनासह पळून गेला. यात रघुनाथ तुलावी यांचा जागीच मृत्यू झाला. तुलावी हे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था गोठणगाव येथे संचालकपदी कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.



