गडचिरोलीविदर्भ

संघटनात्मक बळकटीसाठी आम आदमी पार्टी, गडचिरोलीद्वारे दोन नव्या नियुक्त्या जाहीर

संजय जिवतोडे यांची जिल्हा संघटक तर डॉ. देवेंद्र मुनघाटे यांची जिल्हा शेतकरी संघटक म्हणून नियुक्ती

गडचिरोली: आम आदमी पार्टी (आप) च्या गडचिरोली जिल्हा शाखेने आपल्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. संजय महादेव जिवतोडे यांची जिल्हा संघटक म्हणून, तर डॉ. देवेंद्र द्यानदेव मुनघाटे यांची जिल्हा शेतकरी संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती सोहळ्याला पक्षाचे राज्य प्रभारी प्रकाश जेरवाल आणि प्रदेश अध्यक्ष अजित फाटके पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

रामपुरी वार्ड, गडचिरोली येथील रहिवासी असलेले संजय जिवतोडे यांच्यावर पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कार्यांचे नियोजन, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि पक्षाची सदस्यता वाढवणे यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, रामनगर, चामोर्शी रोड, गडचिरोली येथील रहिवासी डॉ. देवेंद्र मुनघाटे यांच्यावर शेतकरी समुदायाच्या समस्यांचे निराकरण, पक्षाच्या शेतकरी कल्याण कार्यक्रमांचा प्रसार आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी असेल.

या नियुक्त्या पक्षाचे प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर आणि जिल्हा अध्यक्ष नसिर हाशमी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने जारी करण्यात आल्या आहेत. दोन्ही नियुक्त्या ११ जुलै २०२५ पासून प्रभावी असून, त्या प्रारंभी एका वर्षासाठी असतील.

जिल्हा अध्यक्ष नसिर हाशमी यांनी या नियुक्त्यांवर बोलताना सांगितले, “प्रकाश जेरवाल आणि अजित फाटके पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या नियुक्त्यांमुळे गडचिरोली जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढेल आणि शेतकरी तसेच सामान्य नागरिकांच्या हितासाठी आमचे कार्य अधिक प्रभावी होईल.”

या नियुक्त्यांमुळे गडचिरोली जिल्ह्यात आम आदमी पार्टीची पकड मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button