
सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग
एटापल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य सैनु गोटा आणि शाळा व्यवस्थापन समिती गट्टाचे अध्यक्ष गोविंद शहा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सकाळी आठ वाजता शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांनी योगाभ्यासासाठी उपस्थिती लावली. मुख्याध्यापक बेडके यांनी सर्वांना योगासने शिकवली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने शिकवलेले योग प्रकार पूर्ण केले. श्री. बेडके सरांनी यावेळी उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांना नियमित योगाभ्यास करण्यास प्रोत्साहित केले.
मुख्याध्यापक बेडके सर यांनी प्रमुख अतिथी सैनु गोटा आणि गोविंद शहा यांचे स्वागत केले. शाळेतील शिक्षक महेश टेकाम यांनी उपस्थितांचे आभार मानले.



