गडचिरोलीविदर्भ

गावागावात मादक पदार्थ नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करणार

25 गावांच्या इलाका बैठकीत निर्णय

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कुरुमवाडा येथे जारावंडी इलाका समितीची बैठक शिशु नरोटे यांचे अध्यक्षतेत घेण्यात आली. यात अवैध दारूविक्री बंदीसह घरगुती दारूचे प्रमाण कमी करीत दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी गावा-गावात मादक पदार्थ नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले.

या बैठकीत 25 गावातील गाव पाटील, भुमया यांनी पेसा कायद्याची अंमलबजावणी करत गावातील घरगुती दारू वापर बंद करण्यासह आपले आदिवासीचे आरोग्य रक्षणासाठी गाव दारूमुक्त करण्याकरिता प्रयत्न करण्याचे ठरविले. सोबतच २५ गावात मादक पदार्थ नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करत व्यसनमुक्त गाव निर्माण करण्यासाठी प्रत्येक गावात ठराव घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.

या बैठकीत मुक्तीपथ तालुका संघटक किशोर मलेवार यांनी दारू ही मानवासाठी वाईट आहे. दारूमुळे घरगुती वाद होतात. गावातील बैठकीत  गोंधळ घातला जात असल्याने आपले विकासात्मक मुद्यावर सकारात्मक चर्चा घडून येत नाही. दारू पिण्यामुळे बुद्धी कमजोर होऊन विचार शक्ती कमकुवत होत चालली आहे. व्यसनांपासून आपले समाजाला (व्यक्तीला) दूर ठेवणे गरजेचे आहे. मोहफुलापासून  केवळ दारूच बनत नाहीत तर पौष्टिक मोह लाडू व इतर खाद्य पदार्थ तयार होत असतात. यातून आर्थिक स्थिती सुधारू शकते. पेसा मादक पदार्थ विक्री नियंत्रण कायद्यानुसार आदिवासी गावातील घरगुती दारू बंद, खर्रा सुगंधित तंबाखू, गांजा, लंदा अश्या मादक पदार्थांवर संपूर्ण बंदी घालण्याचा अधिकार पेसा गाव सभेला असल्याची माहिती दिली. बैठकीत मुक्तिपथचे आकाश भोयर, शिबू कोकोडे, जारावंडी परिसरातील २५ गावातील गाव पाटील, भूमया उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button