गोंदियाविदर्भ

मृत शिक्षकाला बोर्डाने दिले परीक्षेचे काम

नागपूर बोर्डाचा अजब कारभार

गोंदिया : सहा महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या नावाने नागपूर बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी एक नव्हे तर तब्बल दोन शाळेत बहिर्गत परीक्षक म्हणून नियुक्ती आदेश दिले आहे. संबंधित शिक्षक हयात नसल्याची माहिती संबंधित शाळेने बोर्डाला कळविल्यानंतरही बोर्डाने मृत शिक्षकाच्या नावाने आदेश काढले आहे. त्यामुळे बोर्डाच्या अजब कारभाराची सर्वत्र चर्चा आहे.

सालेकसा येथील जानकीबाई विद्यालयातील शिक्षक मिलिंद पंचभाई यांचा २ ऑगस्ट २०२४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याला सहा महिने लोटले. संबंधित शाळेने शिक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती बोर्डाला रितसर पाठविली आहे. मात्र ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी मृतक शिक्षक मिलिंद पंचभाई यांना तिरखेडी आणि बिजेपार या दोन्ही शाळेत बहिर्गत परीक्षक म्हणून जाऊन प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे आदेश पाठविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button