
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या वतीने 26 डिसेंबर रोजी, दुपारी ०२:०० वाजता, ‘वीर बाल दिवसा’ निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रमुख वक्ते म्हणून महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांचे “चार साहेबजादो की शहादत” तर फुले आंबेडकर कॉलेजचे प्रा. डॉ. दिलीप बारसागडे यांचे “काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी बालक आणि युवकांची भुमिका” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्रमुख उपस्थिती म्हणून प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आदी उपस्थितीत राहणार आहे. विद्यापीठातील सर्व विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



