गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

जहाल महिला नक्षलीचे पोलीस व सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

शासनाने जाहिर केले होते 06 लाख रूपयाचे बक्षिस

गडचिरोली : शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षलवाद्यांसह अनेक जहाल नक्षलवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 672 नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. 21 ऑगस्ट रोजी जहाल महिला नक्षलवादी संगिता पुसू पोदाडी ऊर्फ सोनी ऊर्फ सरीता ऊर्फ कविता (वय 40) वर्ष, रा. तुर्रेमरका, पो. लाहेरी, ता. भामरागड हिने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. तिच्यावर राज्य शासनाने ०६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

संगिता पुसू पोदाडी ऊर्फ कविता ही 2007 मध्ये नैबरेड दलम माड डिव्हिजन नारायणपुर (छ.ग) मध्ये सदस्य पदावर भरती झाली. 2008 मध्ये कोहकामेटा दलम माड डिव्हिजन नारायणपुर (छ.ग) मध्ये बदली होवुन 2010 पर्यंत कार्यरत होती. 2010 मध्ये महासमुंद (छ.ग.) दलममध्ये बदली व त्यानंतर 2014 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होवुन आजपर्यंत कार्यरत होती. तिच्यावर एकूण ११ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ०७ चकमक, जाळपोळ व ०३ खुनाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाने संगिता पुसू पोदाडी ऊर्फ सोनी ऊर्फ सरीता ऊर्फ कविता हिचेवर 06 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन संगिता पुसू पोदाडी ऊर्फ सोनी ऊर्फ सरीता ऊर्फ कविता हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकुण 24 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व दाओ इंजिरकान कींडो, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button