गडचिरोलीविदर्भ

संविधान दिनानिमित्त बेझलवार महाविद्यालयात दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन

प्रा. डॉ. रवींद्र हजारे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

अहेरी: स्थानिक श्री. शंकरराव बेझलवार कला व वाणिज्य महाविद्यालयात २५ व २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. विजय इ. सोमकुवर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग प्रमुख प्रा. गजानन जंगमवार यांच्यातर्फे हा कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्र शासन शिक्षण संचालन (उच्च शिक्षण) यांच्या निर्देशानुसार, भारतीय तत्त्वज्ञान, मूल्ये, आदर्श आणि संविधान निर्मितीचा उद्देश स्पष्ट करण्याकरिता तसेच भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता वाढविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. रवींद्र हजारे यांनी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून घेतले. विचार मंचावर प्रा. डॉ. मंगला बनसोड, प्रा. प्रभाकर घोडेस्वार, प्रा. ज्ञानदीप आवारी होते. कार्यक्रमाला प्रा. सी. गौरकार, प्रा. एस. लांडे, प्रा. जी. तेलंग, प्रा. पेंदाम, प्रा. बंडावार, प्रा. डॉ. घोनमोडे, प्रा. तुंडुलवार, प्रा. गर्गम, प्रा. काटकर, जाकेवार उपस्थित होते.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, सचिव प्रशांत पोटदुखे व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button