राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून १०१२ प्रलंबित आणि १०१४४ दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली
लोकन्यायालयाच्या माध्यमातून ९४ लाख २४ हजार रुपयांची वसुली

गडचिरोली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांचे आदेशान्वये व उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानसुार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हा न्यायालय व जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयात २८ सप्टेंबर रोजी या वर्षातील तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयामध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, धनादेशाबाबतची कलम १३८ अन्वयेची प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेची कर्ज वसुलीची प्रकरणे व दिवाणी प्रकरणे असे न्यायालयात प्रलंबीत दावे व दाखलपुर्व वाद प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची थकीत विजबील प्रकरणे, पतसंस्था व बँकाची यकीत कर्ज प्रकरणे, फायनान्स कंपनीची यकीत कर्ज प्रकरणे, ग्रामपंचायतींची थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे, घरकुल अनुदान वसुली प्रकरणे तसेच ग्राहक न्यायालयातील प्रकरणे, मोटार वाहन कायदा अंतर्गत चालान प्रकरणे ठेवण्यात आली होती.
सर्व जिल्हयात मिळून एकुण १० पॅनल ठेवण्यात आले होते. या पॅनल समोर सर्व प्रकारची मिळून एकुण १०१२ प्रलंबित आणि १०१४४ दाखलपुर्व खटले आपसात तडजोडीने निकाली निघाले. या लोकन्यायालयाच्या माध्यमातून एकुण रूपये ९४,२४,५१३/- ची वसुली झाली. किरकोळ गुन्हा प्रकरणांमध्ये एकुण ४६ प्रकरणे गुन्हा कबूली व्दारे निकाली निघाली. लोक अदालतपुर्वी ५ दिवस स्पेशल ड्राइव्ह अंतर्गत फौ. प्र.सं. कलम २५६, २५८ अन्वये ६६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विकास शि. कुलकर्णी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव राजेंद्र आर. पाटील यांचे देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) तथा मुख्य न्यायदंडाधिकारी सचिन पी. सदाफळे यांनी पॅनल क. ०१ वर काम पाहीले, पॅनल क. ०२ वर दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) चामोर्शी वाय. जे. वळवी, पॅनल क. ०३ वर अतिरिक्त सहदिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) एस. ए. भैसारे यांनी काम पाहिले.
२८ सप्टेंबर रोजी कार्यालयीन कामकाज दिवस घोषीत करुन किरकोळ गुन्हयाचे खटले फौ. प्र.सं. कलम २५६, २५८ अन्वये तसेच गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्याकरीता दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) चामोर्शी वाय. जे. वळवी यांचे पॅनल कार्यरत होते. तसेच पॅनल क्रमांक ०१ मध्ये पॅनल सदस्य म्हणून आकाश प्रभाकर आंबोरकर, सामाजिक कार्यकर्ता पॅनल क्रमांक ०२ मध्ये पॅनल सदस्य म्हणून कु. तेजस्विनी महेंद्र सहारे, सामाजिक कार्यकर्ती, पॅनल कमांक ०३ मध्ये पॅनल सदस्य म्हणून कु. करिश्मा रूषीजी नैताम, सामाजिक कार्यकर्ती यांनी काम केले.
सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघातील समस्त अधिवक्ता वृंद, न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे अधिक्षक पी. व्ही. भागवतकर, वरिष्ठ लिपीक एन. आर. भलमे, एम. डी. गुरनुले, एस. के. चुधरी, जे. एम. भोयर, कनिष्ठ लिपीक एच. एम. गायमुखे, लेखापाल एन. यु. बुरांडे, कार्यालय सहाय्यक आर. एस. नेरकर, शिपाई एस. एस. नंदावार यांनी अथक परिश्रम घेतले.



