भंडारामहाराष्ट्रविदर्भ

एड्स (एचआयव्ही) नियंत्रण कार्यक्रमांमध्ये जिल्हा रुग्णालयाची उत्कृष्ट कामगिरी

भंडारा : महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी मुंबईकडून 13 जून ला यशदा पुणे येथे सन 2023-2024 करिता एड्स (एचआयव्ही) नियंत्रण कार्यक्रमांमध्ये जिल्हा रुग्णालय, भंडाराला उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॉ. विजय कंदेवाड (APD MASACS Mumbai) यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम, डॉ. हिरालाल निरगुडकर, जिल्हा सुपरवायझर मनोज येरणे यांना गौरविण्यात आले.

यावेळी डॉ. राहुल जाधव, डॉ. प्रियंका वाघेला, डॉ. लोकेश गबने, सुदेशना चक्रवर्ती, सुजित आडकर  तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डॉ. दिपचंद सोयाम यांनी सांगितले की, हे टीम वर्क असून जिल्ह्यातील संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कठीण परिश्रमाचे फळ आहे. येणाऱ्या वर्षात उत्तम कामगिरी करून 100 टक्के मोफत आणि योग्य आरोग्य रुग्ण सेवा देण्याचा मानस आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button