गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

लॉयड्स मेटल्स कंपनीच्या वतीने हेडरी येथे जागतिक योग दिन साजरा

गडचिरोली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लॉयड्स मेटल्स कंपनीच्या वतीने अतिदुगम व आदिवासीबहुल हेडरी येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत योगासनांचे धडे गिरविण्यात आले.

लॉयड्स मेटल अँड लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन, तसेच सुरजागड लौह खनिज खाण व्यवस्थापनाने हेडरी येथील पटांगणावर हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे उ‌द्घाटन लॉयड मेटल्सचे अधिकारी कै. सत्या राव, साईकुमार, अरुण रावत, शेट्टी, राजा यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते पार पडले. योग प्रशिक्षक संगीता, सहायक प्रशिक्षक अरविंद यांनी उपस्थितांना योगासनांचे धडे दिले. यात एक हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही योग प्रशिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button