भंडारामहाराष्ट्रमुख्य बातमीविदर्भ

मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची जोरदार घोषणाबाजी

प्रकल्पग्रस्तांचा निषेध ; व्यक्त केला रोष

भंडारा : विकासकामांच्या भूमिपूजनासाठी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २४ जून जोरी प्रकल्पग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री सभास्थळी येताच गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी जोरदार घोषणाबाजी केली. सभेत व्यत्यय निर्माण झाल्याने पोलिसांची बरीच धावाधाव झाली. अखेर यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे सभास्थळी आगमन झाले. स्वागताच्या कार्यक्रमानंतर प्रास्ताविक झाल्यावर मंचाच्या डाव्या बाजूकडून प्रकल्पग्रस्तांनी जोरदार घोषणाबाजी आणि विरोधात नारे लावणे सुरू केले. यामुळे एकच गदारोळ उडाला. प्रकल्पग्रस्त बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटू शकलेला नाही. तो आधी सोडवा, अशी त्यांची मागणी होती. या आंदोलनकर्त्यांच्या हातामध्ये मागण्यांचे निवेदन होते. दरम्यान, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून तीन व्यक्तींना ताब्यात घेतले. दहा ते पंधराच्या संख्येत महिला देखील आल्या होत्या. त्यांनादेखील महिला पोलिसांनी ताब्यात घेऊन सर्वांना वाहनातून भंडारा पोलिस ठाण्यामध्ये रवाना केले. या सर्वांवर कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून सूचनापत्रावर सायंकाळनंतर या सर्वांची सुटका करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button