गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

९९ कोटी ११ लाख रूपयांच्या निधीतून होणार मार्कंडा देवस्थानाचे जीर्णोद्धार

आ. डॉ. होळी यांच्या प्रयत्नांना यश ; सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामाची जबाबदारी

गडचिरोली : मार्कंडा देवस्थानाच्या विकासासाठी ९९ कोटी ११ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला असून एमएसआरडीसीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आता कामाची जबाबदारी आल्याने मागील कालावधीपासून थांबलेल्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी मार्केडा देवस्थानाच्या या कामाच्या नियोजनाच्या पाहणी प्रसंगी दिली. या देवस्थानाच्या विकासासाठी ९९ कोटी ११ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

मुख्य मदिराच्या जीर्णोद्धार व संवर्धनाकरिता २० कोटी ८१ लाख रुपये, नदीच्या पलीकडे पोहोचण्यासाठी भाविकांसाठी पुलाची निर्मिती २०० मीटर लांब ५ कोटी ५० लाख रुपये, धर्मशाळांचे सुधारणा १ कोटी रुपये, घाट व कपडे बदलण्याच्या जागेसह नदी परिसराचे सुशोभीकरण १५ कोटी ८६ लाख रुपये, मूळ पासून ५ मीटर रुंदीचा रस्ता बांधकामासाठी १७ कोटी ५० लाख रुपगे, घाट व कपडे बदलण्याच्या जागेसह नदी परिसराचे सुशोभीकरण १ कोटी ८३ लाख, माहिती केंद्र (८०० चौरस मीटर) ६ कोटी ५० लाख रुपये अशा प्रकारे मार्कंडा देवस्थानाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्य सरकारचे आभार मानले असून कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी  उपसरपंच उमाकांत जुनघरे, गजानन भांडेकर, बांधकाम विभागाचे अधिकारी साखरबाडे, बडे, मृत्युंजय गायकवाड, पुरातत्व विभाग १ च्या शिवानी शर्मा, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, भाजपा तालुका उपाध्यक्ष जयराम चलाख, भाऊजी बहलकर, भाजयुमो उपाध्यक्ष प्रतीक राठी, वसंत चौधरी, भोजराज भगत, विशेष दोषी, रामचंद्र वरवाडे, प्रिया म्हरस्कोल्हे, सुषमा आत्राम यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button