चंद्रपूरमहाराष्ट्रविदर्भ

५४ किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट

चंद्रपूर : चंद्रपूर पोलिसांनी बुधवारी सुपर्ब हायजेनिक डिस्पोजल (इंडिया) प्रा. लि., एमआयडीसी चंद्रपूर येथे ५४ किलो ६४५ ग्रॅम अमली पदार्थाचा साठा जिल्हा न्यायालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीने जाळून नष्ट केला. मागील वर्षी अकराशे किलो अमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्यांपैकी २७ गुन्ह्यांतील अमली पदार्थांचा साठा नष्ट करण्याचा आदेश न्यायालयाकडून मिळाला होता. बुधवारी ५४ किलो ६४५ ग्रॅम अमली पदार्थांचा साठा जाळून नष्ट केला. यावेळी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, पडोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button