गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

गोंडवाना सैनिकी विद्यालयात राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात २६ जून रोजी राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे वरिष्ठ शिक्षक घनश्याम वाळके उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावांनी प्रसिद् होते. मराठ्यांच्या भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे ते राजे होते. राजर्षी शाहू हे अजूनही खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली होते. राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते, असे प्रतिपादन संजीव गोसावी यांनी केले.

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, असे मत ओमप्रकाश सांग्रामे यांनी मांडले. कार्यक्रमाचे संचालन रहीम पटेल यांनी केले तर आभार किशोरलाल साठवणे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button