विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज – जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले

गोंदिया : दरवर्षी एक वर्षाचा अभ्यासक्रम असतो ज्यामध्ये परीक्षा संपल्यानंतर सर्व मुलांना उन्हाळी सुट्टी दिली जाते. दरवर्षी सुट्ट्या संपल्यानंतर मुलांना नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. मुलांच्या प्रवेशापूर्वी शाळेतील स्वच्छता, आवारातील स्वच्छता तसेच शाळेच्या आवारात स्वच्छतागृह, किचन शेड अशा अनेक ठिकाणी स्वच्छता करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत सर्व सुविधा मिळाव्यात व त्यांच्या स्वागतेसाठी प्रशासनाची टीम तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचारी याची खात्री करीत असतात. शाळेच्या परिसराजवळ कोणत्याही प्रकारचा अंमली पदार्थाचे व्यसनी किंवा विक्रेते नसावेत जेणेकरून मुले त्याचा बळी होऊ नयेत आणि शाळेतील शिक्षक मुलांना शिस्तीने चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करतील त्यासाठी जिला परिषद प्रशासन सज्ज असल्याचे अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी दिली आहे.
येत्या १ जुलैपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू होत असून, त्यासाठी जिल्हा परिषद शाळांनी सर्व प्रकारची तयारी केली आहे. शाळेमध्ये येणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्वागतेकरीता जिला परिषद प्रशासनाने पूर्णपणे तयारी केली असून नियमाचा अधीनस्थ शाळेतील मुलांसाठी दुपारी जेवणाची व्यवस्था करण्यात येणार असून, मुलांना प्रेमाने शिक्षण दिले जाईल जेणेकरून मुलांमध्ये शिक्षकांचे नाते चांगले राहावे आणि नवीन प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे थाटामाटात स्वागत करण्यात येईल, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे, अशीही माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी दिली आहे.



