भंडारामहाराष्ट्रविदर्भ

भरधाव कार उलटून दोन जण ठार, एक जखमी

सानगडी उड्डाणपुलावरील घटना

भंडारा : सानगडी येथील उड्डाणपुलावर भरधाव वेगाने जाणारी कार उलटली. यात दोन जण ठार, तर एक १४ वर्षीय बालक जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात कांता गजभिये व त्यांचा मुलगा डॉ. सुफल गजभिये, दोन्ही रा. रायपूर यांचा मृत्यू झाला. शिवम गजभिये, असे जखमी झालेल्या मुलाचे नाव असून, त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार, रायपूर येथील रहिवासी असलेले डॉ. सुफल गजभिये हे त्यांची आई कांता व मुलगा शिवमसोबत लग्नकार्यासाठी कार क्रमांक सीजी ०४ एचजे ४४८४ ने नागपूरला जात होते. साकोली उड्डाणपुलावर असताना अग्रवाल पेट्रोल पंपासमोर रस्त्यावर पाणी साचले होते. या पुलावरील पाणी कारवरील काचावर आल्याने गाडी चालवीत असलेले डॉ. सुफल गजभिये हे दचकले. याचवेळी त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावर आपटले व उलटले. अपघात एवढा भीषण होता की, वाहनाचे तोंड विरुद्ध दिशेने झाले. उड्डाणपुलावरील लोकांनी तात्काळ धाव घेत मदतीचा हात दिला.

मात्र, तोपर्यंत घटनास्थळी कांताबाई यांचा मृत्यू झाला होता. डॉ. सुफल गजभिये यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. १४ वर्षीय शुभम हा सुदैवाने बचावला. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button