गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

सिरोंचा-धर्मपुरी पुलाचे बांधकाम आणि सिरोंचा-महादेवपूर मार्गाच्या बांधकामात दिरंगाई – नगरसेवक सतीश भोगे

संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची केली मागणी

गडचिरोली : सिरोंचा-धर्मपुरी ते सिरोंचा-महादेवपुर मार्गाच्या चौपद्रीकरणाचे काम सुरु आहे. कोणत्या पद्धतीने काम केले पाहिजे, कामाचा दर्जा काय ही जबाबदारी संबंधित अभियंत्याची आहे. सदर बांधकाम कासवगतीने सुरू असून कामाचा वेग वाढवण्याची मागणी नगरपंचायतचे नगरसेवक सतीश भोगे यांनी केली आहे.

सध्या बाजूने जाण्यासाठी दोन मार्ग बनवलेले आहे. एक मार्ग चिखलमय झालेला आहे. दुसऱ्या मार्गावरून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. दोन पाईप टाकले आहे. मात्र त्या ठिकाणी रस्ता वाहून गेल्याने छोट्याश्या मार्गामधून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्या ठिकाणावरून एखादी दुचाकी वाहनधारक खाली पडल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी संबंधित कांत्रटदारांनी याकडे लक्ष देऊन साईड डायव्हर्शन चांगल्या पद्धतीने करावे आणि मार्ग मोकळा करावा अशी मागणी सतीश भोगे यांनी केली आहे.

एवढ्या मोठ्या बांधकामासाठी मार्ग बंद करून ठेवणे आणि साईड डायव्हर्शन साठी वेगळा निधी येतो. मात्र या निधीचा वापर न करता निधी उचल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिरोंचा-धर्मपुरी तसेच सिरोंचा-महादेवपुर मार्गाचे चौपद्रीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. एका बाजूने खोदून ठेवल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे संबधीत ठेकेदारांचे दुर्लक्ष होत आहे.

सिरोंचा-धर्मपुरी मार्गावर असलेल्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. ६ जून रोजी रात्री पुल वाहून त्या ठिकाणी मोठा खड्डा पडून मार्ग बंद झाला होता. या मार्गाने तेलंगाना वरून येणाऱ्या बसेस बंद झाल्याने दोन ते तीन दिवस लोकांना ३ किमीची पायपीट करावी लागली होती. सद्या या मार्गावरून बसेस बंदच आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर एखाद्या पुलाचे बांधकाम करताना जुना पुलल तोडून  नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्याअगोदरच लोकांचे मार्गक्रमण बंद होऊ नये म्हणून बाजूने ये-जा करण्यासाठी पाईप टाकून रस्ता बनवण्यात येतो. (साईड डायव्हर्शन-side diversion) बाजूने मार्ग तयार करण्यासाठी कंत्राटदाराला वेगळा निधी पण उपलब्ध असतो. मात्र बाजूने कुठलाही रस्ता न बनवताच दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे साठवून ठेवल्याने ६ जून रोजी रात्री आलेल्या पावसाने अख्खा पुलच वाहून गेला होता.

पुलाचे बांधकाम बंद ठेवल्याने तेलंगणावरून येणाऱ्या बसेस पाच ते सहा किलोमीटर फिरून येत असल्याने प्रवासी तसेच ड्रायव्हर कंटाळून जात आहेत. काही बसेस मार्ग बंद असल्याने धर्मपुरी पासूनच वापस जात आहेत. संबंधित कंत्रादाराच्या मनमानी कामामुळे सर्वसामान्य लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

पुलाच्या बाजूने पक्के डायव्हरझन  (diversion) न करता तसेच बाजूने कच्चा रस्ता न बनवता रस्ता बंद करून बस आणि मोठ्या वाहनांना मार्गावरून मार्गक्रमण करण्यासाठी बंद ठेवल्याने सर्वसामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची अशी मागणी केली जात आहे.

तसेच सिरोंचा-महादेवपूर महामार्गावरून जिवघेणा प्रवास सुरु झाला आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड वरून सिरोंचा शेजारच्या तेलंगाना राज्यात असलेल्या कालेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी नेहमी वर्दळ असते. मात्र सिरोंचापासून कालेश्वरला पोहोचणे झाले आहे.ण राज्यासह जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुका क्षेत्र तेलंगणा राज्य सीमेलगत वसले आहे. गोदावरील नदीवर पूल निर्मिती होताच या भागातील नागरिकांचा तेलंगणा राज्याशी अधिकच संपर्क वाढला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून सिरोंचा-महादेवपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामात संथगती असल्याने दररोज या मार्गावर अपघाताचे सत्र सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. या मनस्तापामुळे सदर मार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून जोर धरत आहे.

सिरोंचा ते धर्मपुरी टी-पॉइंट पासून तर गोदावरी पुला पर्यंत या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. परिणामी या मार्गाची एक बाजू खोदून ठेवली असून दुसऱ्या बाजूकडून मार्गक्रमण सुरू आहे. मात्र या खोदकामादरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत कोणतेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही. परिणामी अवजड वाहनांसह चारचाकी तसेच दुचाकी वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कामाच्या संथगतीमुळे या मार्गावर अनेक अपघात घडून येत आहे. सदर महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र पावसाळ्यात हीच स्थिती कायम राहिल्यास समस्येत अधिक भर पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने रस्ता बांधकामाला गती देऊन काम पूर्ण करावे, अशी मागणी प्रवाशांसह वाहतूकदारांकडून होत आहे.

नद्यांचा तालुका म्हणून जिल्ह्यात सिरोंचाची ओळख आहे. सिरोंचा शहरालगत सर्वात मोठी गोदावरी व प्राणहिता नदी वाहते. सिरोंचा- कालेश्वरम-महादेवपूर महामार्गावर गोदावरी तर सिरोंचा-चेन्नूर महामार्गावर प्राणहित नदी वसली आहे. या दोन्ही नद्यांवर मोठे पूल उभारल्यापासून सिरोंचा तालुकावासीयांना तेलंगणा राज्यात पोहोचणे अधिक सुलभ झाले आहे. तालुका मुख्यालयापासून केवळ ३० किमी अंतरावर चेन्नूर शहर असून येथून विविध वस्तूंसह आरोग्य सेवाही घेतली जात आहे. परिणामी सिरोंचावासी जिल्हास्थळ गडचिरोलीऐवजी तेलंगणा राज्याला अधिक महत्त्व देत आहेत. तालुकावासीयांचे रोटी तसेच बेटीचेही व्यवहार तेलंगणाशी होत असल्याने सिरोंचावासीयांची मदार तेलंगणा राज्यावर निर्भर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button