भंडारामहाराष्ट्रविदर्भ

नवनिर्मानाधीन पुलावर पडला खड्डा

तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग

भंडारा : तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगेच्या नवनिर्मानाधीन पुलाच्या मध्यभागी रस्त्याला एका ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा संबंधित विभागाने बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक आहे. त्यामुळे पुलाच्या मध्यभागी खड्डा नेमका कशामुळे पडला याचा शोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. हा रस्ता व पूल राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत येत असल्याने ही जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे.

मनसर-तुमसर-गोंदिया असा हा राष्ट्रीय महामार्ग असून, माडगी शिवारातील वैनगंगा नदीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतुकीकरिता पुलाचे बांधकाम केले आहे. येथे वैनगंगा नदी पात्र हे विस्तीर्ण आहे. राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात चोवीस तास जड वाहतूक सुरू असते. या पुलावर काही दिवसांपूर्वी एक मधोमध खड्डा पडला, या खड्ड्याचा आकार वाढत गेला.

या पुलावरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे या खड्ड्याने लक्ष वेधून घेतले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा खड्डा भरला; परंतु येथील जड वाहतुकीमुळे या खड्यातील घातलेले सिमेंट काँक्रीट व इतर रासायनिक पदार्थ पुन्हा बाहेर निघत आहे. त्यामुळे हा खड्डा नेमका कशामुळे पडला, याच्या शोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.

या पुलावरून वाहतूक सुरू होऊन एक ते सव्वा वर्षाच्या काळ लोटला तरी अजूनपर्यंत या पुलाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले नाही. उद्घाटन का करण्यात आले नाही, याबाबत कुणालाच माहिती नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button