क्राईमभंडारामहाराष्ट्रविदर्भ

शिंदेसेनेच्या शहरप्रमुखावर चाकूने प्राणघातक हल्ला

भंडारा शहरातील घटना ; दोघांना अटक, तिघे पसार

भंडारा : अपघातानंतर झालेले भांडण सोडविणाऱ्या शिंदेसेनेच्या शहरप्रमुखावर चारजणांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला. यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. ही घटना भंडारा शहरातील खांबतलाव चौकात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. मंगेश अशोक मुरकुटे (४१, रवींद्रनाथ टागोर वॉर्ड, लालाजी लॉनजवळ, खात रोड, भंडारा) असे जखमी शहरप्रमुखाचे नाव आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली असून अन्य तिघेजण पसार आहेत.

याबाबत समजले ते असे, मंगेश मुरकुटे हे आपल्या फायनान्स कन्सल्टन्सी ऑफिसमध्ये दुचाकीने जात होते. दरम्यान, खांबतलाव चौकात दोन मोटारसायकलमध्ये अपघात झाल्याचे दिसले. तेथे भांडण सुरू होते. अमन मस्तान (बैरागी वाडा, भंडारा), अनिकेत केकडा (टप्पा मोहल्ला, भंडारा), कालू मेश्राम (कस्तुरबा गांधी वॉर्ड, भंडारा) यांच्यासह अनोळखी दोन युवक अपघात झालेल्या मोटारसायकलस्वार व्यक्तीसोबत भांडण करीत होते. मंगेश मुरकुटे यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली असता त्यांनी त्यांच्याशीच वाद घातला.

तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. रात्री उशिरा दोघा जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. उर्वरित तिघांचा पोलिस शोध घेत आहेत. तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक चालूरकर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button