गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपोषण घेतले मागे

उपोषण मंडपाला निवासी उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे यांची भेट

गडचिरोली : अहेरीला जिल्हास्थानाचा दर्जा देण्यात आला असला तरी अ‌द्याप या ठिकाणी असलेल्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार प्रदान करण्यात आले नाही. याशिवाय अहेरी शहरात ले आऊट संदर्भात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य कामे करण्यात आली असून या कामांच्या चौकशीसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसले. अखेर निवासी उपजिल्हाधिकारी विवेक सांळूखे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली व सदर मागण्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपोषण मागे घेतले.

अहेरी शहरात नगररचनाकार, महसूल विभाग, तलाठी कार्यालय व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगणमताने अनधिकृत ले-आऊटला परवानगी देण्यात आली आहे. अनेक ले-ऑउटला ओपन स्पेस नाही. तर अनेक ले-आऊट हे पुरग्रस्त क्षेत्रात येत असतानाही अशा ले-आऊटची अहेरी शहरात सर्रास विक्री सुरु आहे. देण्यात आलेल्या प्रापर्टी कार्ड संदर्भातही त्यांनी आक्षेप नोंदविला आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने कुठलीच दखल न घेतल्याने अखेर कंकडालवार यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता.

अहेरी नगरपंचायत हद्दीतील नियमबाह्य ले-ऑऊटच्या कामांची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कंकडालवार यांनी केली होती. अहेरी येथील एका जमिनीला अकृषक करण्यासाठी (एनएपी-34) मृत व्यक्तीला जीवंत दाखविण्यात आले. तर आदिवासीची जमिनी गैर आदिवासींना विक्री करताना कुठल्याही प्रकारची शासनाची परवानगी न घेता विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कंकडालवार यांनी केली आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई केली जात नाही. तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचा इशाराही अजय कंकडालवार यांनी दिला होता. अखेर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आज कंकडालवार यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने अजय कंकडालवार यांनी उपोषण मागे घेतले.

महाराष्ट्र विधानसभा विरोधीपक्षा नेते विजय वडेट्टीवार यांचेशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. सदर बाबी लक्षत घेऊन आपण जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली सामोरील अमरण उपोषण थांबवण्यात आले आहे.

यावेळी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष हणमंतू मडावी, नगराध्यक्ष रोजा करपेत, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी जिल्हाध्यक्ष हसन गीलानी, सतीश विधाते, रुपेश टिकले, मनोहर पोरेट्टी, गौरव येनप्रेड्डीवार, अण्णा जेट्टीवा, निकेश गद्देवार, समय्या पसुला, कार्तिक तोगम, सुनीता कुस्नाके, सुरेखा आलम, गीता चालुरकर, अजय नैताम, स्वप्नील मडावी, अशोक येलमुले, राजू दुर्गे, कवडू चलावार, हनीप शेख, तस्सू भैय्या, राकेश सडमेक, सचिन पांचार्या, प्रकाश दुर्गे, दिवाकर आलम, संदीप कोरेत, शिवराम पुल्लुरी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button