चंद्रपूरमहाराष्ट्रविदर्भ

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी 

सिर्सी वनबीटातील घटना

चंद्रपूर : सावली तालुक्यातील व्याहड खुर्द उपवनपरिक्षेत्रातील सिर्सी वनबिटात वाघाने हल्ला चढविला. सुदैवाने गुराखी यातून बचावला असला तरी तो गंभीर जखमी झाला आहे. मुकरू भिकाजी भोयर (४५) रा. कढोली असे जखमीचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.

मुकरू भोयर हा गावाजवळच्या जंगल परिसरात गुरे चरायला घेऊन गेला होता. गुरे चारत असताना झुडुपात दबा धरून असलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर झडप घातली. गुराख्याने वाघाच्या हल्ल्याचा प्रतिकार करीत असताना आरडाओरड केली. या आवाजाने गावाशेजारील नागरिकांनी त्या दिशेने धाव घेतली. मात्र वाघाने मुकरू भोयर याला गंभीर अवस्थेत जखमी करून धूम ठोकली होती. नागरिकांनी घटनास्थळावर जखमी अवस्थेत पडलेल्या गुरख्याला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. माहिती मिळताच क्षेत्र सहायक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सिर्सी वनबीटाचे वनरक्षक मुंडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या परिसरात शुक्रवारी रात्री ८:३० वाजताच्या एका चारचाकी वाहनधारकाला रस्त्यावर दिसला होता. यानंतर वाघ याच परिसरात होता. या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी कढोलीचे सरपंच किशोर कारडे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button