
कुरखेडा : तालुक्यातील सावरगाव (येंगलखेडा) येथे ८ जुलै रोजी शेतीकाम करताना तरुणास सर्पदंश झाला. उपचारासाठी दवाखान्यात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
करण संजय उईके (२२, रा. बोरटोला) असे मयताचे नाव आहे. ८ जुलै रोजी तो शेतीकाम करत होता. यावेळी त्यास सर्पदंश झाला. त्यास तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तपासणी करून डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अविवाहित असलेल्या करणच्या अकाली मृत्यूने जन्मदात्यांवर मोठा आघात झाला आहे.



