गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

नगरपंचायत एटापल्ली येथे स्कुलबस व रुग्णवाहिकेचे लोकार्पण

एटापल्ली : लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील शाळकरी विद्यार्थ्यांन करिता दिलेली बस व तालुक्यातील नागरिकांना वेळीच उपचार मिळण्याकरिता रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा नगरपंचायत एटापल्लीतर्फे नगरपंचायतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. सदर बस व रुग्णवाहिकेचे लोकार्पण नगराध्यक्षा दिपयंती पेंदाम व लॉयड मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक एस. व्यंकटेश्वर  यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, तहसीलदार घागुर्डे, गटविकास अधिकारी आदीनाथ आंधळे, वनपरिक्षेत्र अधिकारी निलिमा खोब्रागडे, गटशिक्षणाधिकारी साईकुमार, बलराम सोमनानी, बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्वावार, पाणीपुरवठा सभापती नामदेव हिचामी, नगरसेवक जितेंद्र टिकले, नगरसेवक राहुल कुळमेथे, नगरसेवक निजान पेंदाम, नगरसेविका निर्मला कोंडबत्तुलवार, नगरसेविका निर्मला हिचामी तसेच विद्यार्थ्यांचे पालकवर्गव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एस. व्यंकटेश्वर उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आम्ही एटापल्लीच्या शाळकरी विद्यार्थ्यांना बस दिली, रुग्णांना वेळीच उपचार मिळावा याकरिता रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, लॉयड मेटल्स कंपनीचे प्रेम एटापल्ली वासियांवर आहे, यामुळे हे शक्य झाले असे ते म्हणाले. नगरसेवक जितेंद्र टिकले यांनी लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे व उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button